एका अफवेमुळे पेट्रोलपंप मालक मालामाल, एका दिवसात संपला 10 दिवसांचा साठा

एका दिवसात 10 दिवसांचा साठा संपवला, ज्यामुळे पेट्रोल विक्रेत्या कंपनीने एका दिवसात नफा कमवला.

Updated: May 12, 2021, 06:11 PM IST
एका अफवेमुळे पेट्रोलपंप मालक मालामाल, एका दिवसात संपला 10 दिवसांचा साठा title=

जळगाव : एक अफवा लोकांचं आयुष्य बदलू शकते, ही अफवा कोणाला श्रीमंत करु शकते तर कोणाला गरीब. अशीच एक घटना महाराष्ट्रातील मुक्ताईनगर भागात मंगळवारी घडली. एका अफवेमुळे जवळपासच्या पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी उसळली. खरंतर कोणीतरी अशी अफवा पसरविली होती की, कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे पुढील 10 दिवस येथील पेट्रोल पंपही बंद राहणार आहेत. त्यामुऴे लोकांनी पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्यासाठी गर्दी केली होती. आणि एका दिवसात 10 दिवसांचा साठा संपवला, ज्यामुळे पेट्रोल विक्रेत्या कंपनीने एका दिवसात नफा कमवला.

कुर्हे या  गावाजवळील दोन पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी जमली होती. यातील एका पेट्रोल पंपमध्ये, सर्व पेट्रोल आणि डिझेलचा साठा एकाच दिवसात संपला. त्यामुळे त्या पेट्रोल पंपवरती आता कोणतेही इंधन उरलेले नाही. यासगळ्या प्रकरणांमुळे पुढील दहा दिवसांचा इंधनसाठा एका दिवसात संपला.

तेथील पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक नागरिकांना सतत समाजावत होते की, या अफवांकडे लक्ष देऊ नका. परंतु लोकं त्यांचे ऐकण्यास आणि समजण्यास तयार नव्हते. लोकांना फक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करायचे होते, त्यासाठी ते कडक उन्हात लांबच लांब रांगा लावून उभे राहिले होते.

यासगळ्या अफवांना लोकांनी इतके मनावर घेतले की, ते तासन तास कडक उन्हात रांग लावून उभे होते आणि आपला नंबर येताच लोकं आठवड्या भराचा पेट्रोल घेऊन जात होते. काही लोकांनी तर हद्दच पार केल. हे लोकं आपल्या सह कुटुंबासोबत येऊन वेगवेगळ्या रांगेत उभे राहिले आणि ज्याचा नंबर पहिला येईल तेथून मग पेट्रोल किंवा डिझेल घेत होते.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत आजही वाढ

राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 98.36 आणि डिझेलचा दर 89.75 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 98.06 आणि डिझेलचा दर प्रति लिटर 88.08 आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत पेट्रोलचा दर 98.56 आणि डिझेलचा दर 89.94 रुपये प्रतिलिटर, नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 98.76 आणि डिझेलचा दर 88.76 रुपये प्रतिलिटर आहे.

त्याचवेळी औरंगाबादमध्ये पेट्रोल 99.60 आणि डिझेल 90.99 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेल किंमतीची ही वाढ पुढील काही दिवस टिकू शकते. आधीच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे त्रस्त झालेले सर्व सामान्य माणूस आता महागाईमुळे पुरताच खचला आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची दररोजची माहिती आपण एका SMS द्वारे (Check daily petrol diesel price) जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल ग्राहक RSP स्पेस पेट्रोल पंपचा कोड टाईप करुन 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 क्रमांकावर RSP लिहून माहिती पाठवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPrice लिहून 9222201122 क्रमांकावर SMS  पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दररोज सकाळी 6 वाजता किंमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, अधिभार आणि इतर गोष्टी त्या किंमतीत जोडल्या जातात. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास दुप्पट होतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोलवर 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर आकारतात.

पेट्रोलवरील केंद्र सरकारचा अबकारी कर 32 रुपये 90 पैसे तर डिझेलवर 31 रुपये 80 पैसे आहे. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोज निश्चित केले जातात.