"महाराष्ट्रातील काँग्रेस नेते 'सामना' वाचत असतील नसतील, तरी सोनिया गांधी वाचतात"- संजय राऊत

महाराष्ट्राच्या जुन्या कँग्रेसच्या नेत्यांनीही 'सामना' वाचून महाराष्ट्रातील जनतेच्या प्रतिक्रिया सोनिया गांधींना सांगितली असती तर चांगले झाले असते.

Updated: May 12, 2021, 05:49 PM IST
"महाराष्ट्रातील काँग्रेस नेते 'सामना' वाचत असतील नसतील, तरी सोनिया गांधी वाचतात"- संजय राऊत title=

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलल्या ‘सामना’ मधून संजय राउत (Sanjay Raut) यांनी बुधवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, तुम्ही लोकं 'सामना' वाचत असाल किंवा नसाल तरी दिल्लीतील सोनिया गांधी ते नक्कीच वाचतात. नाना पटोले यांनी यापूर्वी सांगितले होते की, ते 'सामना' वाचत नाहीत आणि बंगाल निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर काय प्रतिक्रिया देखील प्रसिद्ध झाल्या आहेत, हे देखील त्यांना ठाऊक नाही.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल संजय राऊत यांनी कठोर वक्तव्य केले होते, त्यानंतर महायुती दरम्यान हा तणाव वरवर दिसत होता. अशातच आज सामनामधील मजकुरावरुन वाटतं  की, संजय राऊत काय आता थांबणार नाहीत.

खरंतर, सोनिया गांधी यांनी काँग्रेससच्या कार्यकारी बैठकीत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दरारून झालेल्या पराभवाबद्दल चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, केके वेणुगोपाल यांना या पराभवाचा आढावा घेण्याचे निर्देश देऊन त्यांनी 5 सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.

सोनिया गांधी यांच्या या उपक्रमामुळे संजय राऊत यांना आणखी बळकटी मिळाली आहे. म्हणूनच त्यांनी आजच्या 'सामना'मध्ये लिहिले आहे की, "महाराष्ट्रातील काँग्रेस नेते 'सामना' वाचत असतील किंवा नसतील तरी दिल्लीतील सोनिया गांधी तो नक्कीच वाचतात."

संजय राऊत यांनी असेही लिहिले आहे की, महाराष्ट्राच्या जुन्या कँग्रेसच्या नेत्यांनीही 'सामना' वाचून महाराष्ट्रातील जनतेच्या प्रतिक्रिया सोनिया गांधींना सांगितली असती तर चांगले झाले असते.

'जुन्या काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला, याला जबाबदार कोण?'

संजय राऊत यांनी आजच्या 'सामना'मध्ये असा प्रश्न उपस्थित केला आहे की, काँग्रेसमधील दिग्गज नेते पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात गेले आहेत, ते काँग्रेसला का सोडून गेले. हे असे का झाले? याचा आढावा त्यांनी घ्यावा आणि झालेल्या चुका सुधारून काँग्रेसने पुढे जायला हवे. त्यांनी लिहिले की, महाराष्ट्रातील शरद पवार यांनी काँग्रेसला पुढे आणले. आज अशी माणसे काँग्रेसमध्ये नसतील तर याला जबाबदार कोण?

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी, आसाममधील हेमंत बिस्वा सर्मा, पुडुचेरीमधील एन. रंगास्वामी मुळात काँग्रेसपक्षाचे नेते आहेत. जे आज दुसर्‍या कुठल्याही पक्षात गेल्यानंतर मुख्यमंत्री बनतात. त्यामुळे अखेर काँग्रेस सोडण्याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राऊत यांनी 'सामना'मध्ये केला आहे.

राऊतांचे काँग्रेसच्या 'जी -23' नेत्यांवरही भाष्य

आजच्या 'सामना'मध्ये संजय राऊत यांनी काँग्रेसच्या जी -23 नेत्यांविषयीही भाष्य केले आहे. ज्यांनी असे वक्तव्य केले आहे की, आरोग्याच्या कारणांमुळे सोनिया गांधींना आता काँग्रेसकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसची पुनर्रचना करावी आणि पूर्णवेळ अध्यक्ष शोधावे.

या विषयावर भाष्य करताना राऊत लिहितात, "अध्यक्ष असो वा नसो, पक्ष चालूच राहतो. तळागाळातील कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे घेऊन जातात. सरकारला प्रश्न विचारणे आणि त्यांच्या चुका उघड करणे हे काँग्रेसच्या नेत्यांनी करत राहिले पाहिजे."

राऊत यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले

या अग्रलेखात संजय राऊत यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले की, राहुल गांधी एकटे पडले आहेत. ते आपले कार्य संयम ठेवून करत आहेत. त्यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत टिप्पण्या केल्या जात आहेत, परंतु त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे.

कोरोना युगात राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या बर्‍याच मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाकडून कडाडून टीका केल्या गेल्या, परंतु नंतर राहूल गांधींच्या लसीकरणापासून ते अनेक मुद्द्यांचे सरकारने अखेर अवलंबण केले. आज राहुल गांधी हे काँग्रेसचे सेनापती आहेत. ते ज्या प्रकारे सरकारवर हल्ला करतात तो एकदम अचूक असतो.