कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त? जाणून घ्या

Petrol Diesel Price :  गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतवर दिसून येतो. तुम्ही जर विकेंडला घराच्या बाहेर पडणाकर असाल तर पेट्रोल आणि डिझेलच्या आजेच्या किमती पाहा. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 2, 2024, 09:29 AM IST
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त? जाणून घ्या title=

Petrol Diesel Price on 2 March 2024 : जागतिक  बाजारात क्रूडच्या किमतीत सातत्याने नरमाई सुरु आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात आज (2 मार्च 2024) ब्रेंट क्रूड $83.62 प्रति बॅरल आणि WTI क्रूड $78.47 प्रति बॅरल विकले जाते. पण राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.शनिवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये अनेक ठिकाणी बदल होताना दिसला. एनसीआरमध्ये काही ठिकाणी तेलाच्या किमती घसरल्या आहेत, तर काही शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. महाराष्ट्रात आज पेट्रोल 106.61 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे तर डिझेल 93.12 रुपयांनी विकले जाईल. 

दररोज सकाळी 6 वाजता देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट केले जातात. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांद्वारे इंधनाचे दर जारी केले जातात, जे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित असतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर शुक्रवारी राष्ट्रीय पातळीवर स्थिर राहिले. मात्र शनिवारी सकाळी महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. 

मुंबईत शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.01 रुपये तर डिझेलचा दर 92.53 रुपये प्रतिलिटर आहे.नाशिकमध्ये पेट्रोल 106.86 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.36 रुपये प्रतिलिटर आहे.नागपुरात पेट्रोलचा दर 106.51 रुपये तर डिझेलचा दर 93.04 रुपये प्रतिलिटर आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.75 रुपये दराने विकले जाते. डिझेल 95.45 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.