पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Price : विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर एकदा नक्की तपासा. कारण आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 17, 2024, 11:30 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर  title=

Today Petrol Diesel Price on 17 Feb 2024 : भारतीय तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून अनेक राज्यांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $81.20 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $76.21 वर व्यापार करत आहे. तर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत किरकोळ बदल झालेला नाही. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक बदल झाला आहे.

देशातील महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल करण्यात आला आहे. जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात इंधनाचे दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोलचे दर प्रतिलिटर पाच रुपयांनी कमी केले असते. त्यानंतर राज्यातील इंधनाचे दर स्थिर आहेत. 

महाराष्ट्रातील इंधनाचे दर किती 

महाराष्ट्रात आज (17 फेब्रुवारी 2024 ) पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली, आज पेट्रोल प्रतिलिटर 106.53 रुपयांनी विकले जाणार आहे. तर डिझेलच्या ही दरात वाढ झाली असून 93.03 रुपयांनी विकले जाणार आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तसेच पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.77 रुपये तर डिझेलचा दर 92.30 रुपये प्रतिलिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 92.42 रुपये प्रतिलिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.84 रुपये दराने विकले गेले. डिझेल 95.53 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध होणार आहे. 

एसएमएसवर पेट्रोल डिझेलचे दर तपासा

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेच कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन, तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड प्रविष्ट करावा लागेल आणि नंतर तो 9224992249 या नंबरवर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL वेबसाइटवरून मिळेल.