पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी

Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 23, 2024, 09:33 AM IST
पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी title=

Petrol Diesel Price on 23 january 2024 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. तर गेल्या 24 तासात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 2 डॉलरने वाढल्या आहेत. असे असतानाही मंगळवारी (23 january 2024 ) सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत घट झाली आहे. यूपी, बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्ये आज तेलाच्या किरकोळ किंमती खाली आल्या आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या (Mumbai Petrol Diesel) देशातील महानगरांमध्ये आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 

 दरम्यान भारतीय तेल कंपन्यांनी आज इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. ताज्या किमतीनुसार इंधनाच्या दरात कुठेही बदल झालेला नाही. गेल्या नऊ महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असल्या तरी सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. भारतात इंधनाचे दर स्थिर आहेत. आजही महाराष्ट्रात एक लीटर पेट्रोलसाठी 106.86 रुपये मोजावे लागतात, तर डिझेलसाठी 93.49 रुपये आहेत.  

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

राजधानी दिल्ली पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये आहे. सध्या चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

राज्यातील कोणत्या शहरात किती आहे दर?

ठाणे : पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल 106.59 रुपये, डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
नागपूर : पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.58 रुपये
कोल्हापूर : पेट्रोल 107.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.94  रुपये
नाशिक : पेट्रोल 106.51 रुपये, डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधनाच्या किमतीत काय परिणाम?

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनुसार कच्च्या तेलाची किंमत बदलते. किमतीतील या बदलाचा थेट परिणाम म्हणजे आपल्या देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती. जेव्हा कच्च्या तेलाची मागणी आणि पुरवठा बदलतो तेव्हा किंमती बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवायचे?

भारत शेजारील देशांकडून तेल आयात करतो. त्यानंतर केंद्र सरकार त्यावर कर आकारणार आहे. तसेच, वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंधन वेगळे आणि आकारमान केले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात.