Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.   

श्वेता चव्हाण | Updated: Jun 14, 2023, 08:41 AM IST
Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर  title=
Petrol-Diesel Price on 14 June 2023

Petrol-Diesel Price on 14 June 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (crude oil) किंमतीत सातत्याने चढ-उतार सुरुच आहे. मात्र या महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कधी दिलासा मिळतो याची सध्या सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत आहे. जवळपास 13 महिने उलटूनही तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2022 रोजी अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आला होता. तुम्ही जर आज पेट्रोल पंपावर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर... 

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- अहमदनगर पेट्रोल 106.96 आणि डिझेल 93.46 रुपये प्रतिलिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये तर डिझेल 92.72 रुपये प्रतिलिटर
- अमरावती पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रतिलिटर
- औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
- जळगावात पेट्रोल 106.89 रुपये तर डिझेल 93.38 रुपये प्रतिलिटर 
- कोल्हापुरात पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.80 रुपये प्रतिलिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.38 रुपये आणि डिझेल 93.96 रुपये प्रतिलिटर 
- नागपुरात पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रतिलिटर 
- नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 रुपये आणि डिझेल 94.65 रुपये प्रतिलिटर 
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.06 रुपये प्रतिलिटर 
- परभणी पेट्रोल 109.47 रुपये तर डिझेल 95.86 रुपये प्रतिलिटर
- पुण्यात पेट्रोल 106.73 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
- रायगड पेट्रोल 105.97 आणि डिझेल 93.57 रुपये प्रति लिटर
- सोलापुरात पेट्रोलचा 106.49 रुपये तर डिझेलचा दर 93.29 रुपये प्रतिलिटर 
- ठाण्यात पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रतिलिटर  

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रूडचा दर 70 ते 75 डॉलर प्रति बॅरल दरम्यान राहिला आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडचा दर प्रति बॅरल $69.18 पर्यंत घसरला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $74.07 वर दिसला. 

 तसेच काही दिवसांपूर्वी नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि जयपूरमध्ये किंचित घट झाली होती. 14 जून रोजी तेल विपणन कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांत खासगी तेल कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही सुविधा जून महिन्यापुरतीच होती. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात.

- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.96 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिट