डबक्यातलं पाणी आजारांवर गुणकारी? डबक्यातल्या पाण्यामागचं सत्य काय ?

येथेल गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, हे पाणी प्यायलाने फरत पडतो.

Updated: Jan 2, 2022, 09:39 PM IST
डबक्यातलं पाणी आजारांवर गुणकारी? डबक्यातल्या पाण्यामागचं सत्य काय ? title=

लातूर : अशा बऱ्याच अंधश्रद्धा आहेत, ज्यावरती लोकं डोळे बंद करुन विश्वास ठेवतात. एका गावत असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं आहे. इथे डबक्यातील पाणी कुणी हंड्यामध्ये भरतंय, तर कुणी सायकलवर पाणी नेतंय तर कुणी तिथच बाटलीभर पाणी पिऊन तहान भागवतंय. असं दृश्य पाहून सगळ्यांनाच असा प्रश्न पडला आहे की, इथे दुष्काळ पडलाय की काय ? पण तसं मुळीच नाही. हे पाणी प्यायल्यानं दुर्धर आजार बरे होतात अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तेव्हापासून इथं पाणी भरण्यासाठी लोकांची अशी गर्दी जमू लागली.

लातूरच्या औसा तालुक्यातील एकंबीवाडीचा हा डबका. याच डबक्यातल्या पाण्यानं दमा, मधुमेह, मुतखडा, रक्तदाब, अर्धांगवायू असे अनेक आजार बरे होत असल्याचा दावा इथल्या ग्रामस्थांकडून केला जातोय.

येथेल गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, हे पाणी प्यायलाने फरत पडतो, याचा आम्हाला अनुभव देखील आहे.

डबक्यातल्या या पाण्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्यानं अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं हे निव्वळ थोतांड असल्याचं म्हंटलंय.

 खरंच असं डबक्यातलं पाणी प्यायल्यानं आजार बरे होतात का ? लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं झी 24 तासच्या टीमनं तज्ज्ञांची भेट घेत चर्चा केली. डॉ. हनुमंत किनीकर, एमडी फिजिशिअन असे म्हणाले की, 'असे केल्याने आजार बरे होत नाही. उलट असं पाणी प्यायल्यानं आजार वाढू शकतात.'

डबक्यातल्या या पाण्याची कुठलीही तपासणी झालेली नाही. केवळ ऐकीव महितीच्या आधारे लोक इथं पाणी भरण्यासाठी येतायेत. मात्र असं दुषित पाणी प्यायल्यानं आजार बरा होण्याऐवजी आजार वाढू शकतात हेही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे आमच्या पडताळणीत डबक्यातलं पाणी प्यायल्याने दुर्धर आजार बरे होतात हा दावा असत्य ठरलाय.