ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका - पंकजा मुंडे

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका होतोय असं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.  

Updated: Mar 4, 2022, 03:03 PM IST
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका - पंकजा मुंडे title=
संग्रहित छाया

मुंबई : OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका होतोय असं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. ओबडधोबड अहवाल दिला गेला नसता आणि गंभीरपणे केला असता तर ही वेळ आली नसती, अशी टीका त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली. (Pankaja Munde On OBC Reservation)

ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक नाही हा निर्णय आधी आला पाहिजे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा बळी घेण्याचे काम सुरू आहे. नगरपंचायत निवडणूकाही चुकीच्या पद्धतीने झाल्या. मनपाच्या सगळ्यात जास्त निवडणुका आता आहेत. या सरकारने मराठा समाजाला ही धोका दिला, असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी केला.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होता कामा नये. काही महिन्यांची मुदत घ्या आणि अपवादात्मक केस म्हणून निवडणूक आयोगसोबत चर्चा करा आणि निवडणूका घेऊ नका, असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला आहे.