चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आत्तापर्यंत केवळ 30 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे सगळेच जण पावसासाठी धावा करतायत.
गोंडपिंपरी तालुक्यातल्या झाबा गावात ग्रामस्थांनी पाऊस पडण्यासाठी शिवमंदिराचा गाभारा पाण्यानं भरुन अनोखी पूजा केलीय. अश्या प्रकारे देव पाण्यात बुडवून ठेवल्याने पाऊस पडत असल्याची स्थानिक लोकांची श्रद्धा आहे.
1982 नंतर पहिल्यांदाच ग्रामस्थांनी अशी पूजा केलीय. आणि तेव्हा सुद्धा पाऊस झाल्याचा दावा गावातील वृद्ध मंडळी करतायत.