Onion Rates: कांदा करणार वांदा.... बातमी वाचून बाजाराचा रस्ताच विसराल

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून या अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांद्यांचे भाव पुन्हा एकदा गडगडण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 2, 2022, 08:51 AM IST
Onion Rates: कांदा करणार वांदा.... बातमी वाचून बाजाराचा रस्ताच विसराल title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड: सध्या वातावरणात (Climate Change) एक वेगळाच बदल पाहायला मिळतो आहे. कधी ऊन तर कधी पाऊस यांमुळे वातावरणाची स्थिती बिघडल्याची पाहायला मिळते आहे. सततच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचेही (Farmers in Maharashtra) मोठं नुकसान होते आहे. अवकाळी पावसानं शेतीची परिस्थिती बिघडली आहे. त्याचबरोबर याचा परिणाम अन्नधान्यांवरही होतो आहे. सध्या याचा परिणाम मोठ्या शेतीजन्य परिसरात पाहायला मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकही चितेंत झाले आहेत कारण आता उत्पादन (Production) कमी झाल्यामुळे सध्या अन्नधान्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्जन्यजन्य वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि त्यातून पिकांचे नुकसानही झाले आहे. अनेकदा मोठ्या प्रमाणातही शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. नुकतीच अशीच एक परिस्थिती नाशिक भागातही पाहायला मिळते आहे. 

हेही वाचा - Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...

सततच्या व लांबलेल्या पावसाने लाल कांद्याचे (Red Onions) आगार समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या पूर्व भागात कांदा रोपे खराब झाल्याने कांदा लागवड उशीरा झाली तर जो काही कांदा लागवड झाला होता. तो पावसाने खराब झाल्याने दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा लाल कांद्याचा हंगाम यंदा मात्र एक ते दोन महिने लांबणार आहे.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

नवा कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत नसल्याने जुन्या आणि साठवणूक ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. साठवलेला कांदाही दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला परिणामी कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.सध्या नाशिकच्या (Nashik) या भागातील कांदा खराब झाल्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण आहे. शहरात येणारा हा कांदा पुन्हा एकदा नागरिकांची झोप उडवणार आहे.