वृक्ष लागवड घोटळ्याप्रकरणी कोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन

कोल्हापूर वन विभागातला १ अधिकारी आणि ३ क्षेत्रीय कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

Updated: Dec 20, 2017, 04:36 PM IST
वृक्ष लागवड घोटळ्याप्रकरणी कोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन title=

कोल्हापूर : कोल्हापूर वन विभागातला १ अधिकारी आणि ३ क्षेत्रीय कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

झी २४ तासचा दणका

वन विभागानं दशलक्ष कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरु केली. मात्र या वृक्ष लागवड योजनेत कोल्हापूर वन विभागानं भ्रष्टाचार केला. त्याची बातमी झी २४ तासनं लावून धरली होती. 

कोण आहेत अधिकारी?

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आरविंद पाटील यांनी कारवाई करत करवीरचा वन क्षेत्रपाल विश्वजीत जाधव, हातकणंगलेचा वनपाल वसंत चव्हाण, आणि वनरक्षक मारुती ढेरे, तसंच तमदलगेची वनरक्षक सुप्रिया मदने या चौघांना निलंबित केलं. आता सांगली आणि सातारा वन विभाग आपल्या दोषी अधिकारी-कर्मचा-यांवर कधी कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आ