नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश

नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश आज औरंगाबाद खंडपिठानं दिले. याप्रकरणी दोषींना सगळ्या साक्षीदारांची नव्याने साक्ष नोंदवून, नव्याने पुरावे सादर करावेत असे कोर्टाचे निर्देश आहेत. 

Updated: Dec 20, 2017, 03:49 PM IST
नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश title=

औरंगाबाद : नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश आज औरंगाबाद खंडपिठानं दिले. याप्रकरणी दोषींना सगळ्या साक्षीदारांची नव्याने साक्ष नोंदवून, नव्याने पुरावे सादर करावेत असे कोर्टाचे निर्देश आहेत. 

काय दिले कोर्टाने आदेश?

त्याचप्रमाणे फितूर साक्षीदारांविरोधात कारवाईचे आदेशही खंडपिठानं दिले आहेत. त्याचप्रमाणे आगे कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी असाही आदेश खंडपिठानं दिलाय. संजय भालेराव आणि प्रदीप भालेकर या दोघांनी आगेच्या हत्येप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर आज खंडपिठानं हा निर्णय दिला. 

काय आहे प्रकरण?

साधारण दोन वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावात राहणाऱ्या नितीन आगेची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांवर आरोपपत्र दाखल करून खटला चालवण्यात आला. पण पुराव्या अभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.