टँकरचा अपघात, फुकटातलं तेल मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी

कच्च्या सोयाबीन तेलाच्या टँकरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.

Updated: Jul 19, 2018, 11:25 PM IST
टँकरचा अपघात, फुकटातलं तेल मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी title=

अमरावती: अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तेलाच्या टँकरला झालेल्या अपघातात सांडलेलं तेल घरी नेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पंचवटी चौकात रात्री दहाच्या सुमारात नागपूरकडे जाणाऱ्या कच्च्या सोयाबीन तेलाच्या टँकरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात टँकरला भगदाड पडून त्यातून तेलाची गळती सुरु झाली. त्यावेळी नागरिकांनी सांडत असलेले तेल मिळेल त्या वस्तुंचा वापर करुन भरून नेले.