रत्नागिरीत पुन्हा एकदा आढळला 'समुद्री राक्षस'

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा 'ऑक्टोपस' आढळलाय. 

Updated: Dec 26, 2017, 09:27 PM IST
रत्नागिरीत पुन्हा एकदा आढळला 'समुद्री राक्षस' title=

दापोली, रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा 'ऑक्टोपस' आढळलाय. 

हर्णे किनारा समुद्रकिनारा मुळातच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे सापडतात आणि त्यामुळेच हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले आहे. आता इथं ऑक्टोपस सापडल्याने हा किनारा पुन्हा चर्चेत आलाय.

ऑक्टोपसचे एरवी सिनेमा आणि संग्रहालयामध्येच दर्शन घडते. हर्णे  समुद्रकिनारी डॉल्फीनचेही अधूनमधून दर्शन घडत असते. त्यामुळं इथल्या समुद्र किनार्‍याला पर्यटकांची अधिक पसंती आहे. मात्र, या डॉल्फीनबरोबर अन्य दुर्मिळ सागरी जीवांचेही दर्शन घडू लागल्याने या समुद्र किनार्‍याला पर्यटनाचा वेगळाच साज चढू लागलाय.

पर्यटकांची पसंती असणारा हर्णे समुद्रकिनारा हा नागरिकांना पर्यटनाची साद घालणारा ठरतोय. या किनारी दुर्मिळ ऑक्टोपसचे दर्शन घडल्याने स्थानिक तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर जमले होते.