आता 'बेटीनंतर बेटा बचाव' अभियान

बेटी बचाव अभियान तर आपण ऐकलंच असेल मात्र आता बेटा बचाव अभियानही सुरु करण्यात आलंय.

Updated: Nov 6, 2017, 07:11 PM IST

गोंदिया : बेटी बचाव अभियान तर आपण ऐकलंच असेल मात्र आता बेटा बचाव अभियानही सुरु करण्यात आलंय... मुलगा स्वस्थ रहाण्यासाठी, व्यसनापासून दूर रहाण्यासाठी या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातून करण्यात आली आहे. 

या अभियानाच्या प्रचाराकरता साध्वी भारती यांना ब्रँड अँबेसिडर नेमण्यात आलं आहे. जानेवारी 2018 पर्यंत शासनानं नशाबंदी कायदा पारित न केल्यास दिल्लात भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.