साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास विरोध

साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षा निमित्ताने साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईच्या पादुकांचा देशभर दौरा आयोजीत केलाय, त्यासाठी मोठा खर्च ही केला जात आहे.

Updated: Nov 6, 2017, 05:17 PM IST
साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास विरोध title=

अहमदनगर : शिर्डीतील साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास साईभक्तांचा विरोध आहे. साईंच्या पादुका बाहेर जाव्यात की नाही, या बाबत ग्रामस्थांनी साईंच्या समाधीवर चिठ्ठी टात कैल घेतलाय त्यातही पादुका बाहेर जावु नये असाच कैल आलं आहे. 

मात्र दुसरीकडे साईबाबा संस्थान आज चेन्नईला पादुका नण्याची तयारी करतं आहे. या निर्णयाविरोधात शिर्डीतील छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलंय. मात्र दुसरीकडे चेन्नई येथील भक्तांना दिलेला शब्द पाळवा लागणार असल्याने साई संस्थानच प्रशासन मात्र संभ्रमात पडलंय. 

साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षा-निमित्ताने साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईच्या पादुकांचा देशभर दौरा आयोजीत केलाय, त्यासाठी मोठा खर्च ही केला जात आहे.

देशातील गोवा आणि दिल्ली राज्यात पादुकांचा दर्शन सोहळा झाला आहे, मात्रा साई संस्थान साईंच्या पादुका शिर्ड बाहेर नेत असल्याने शिर्डीतील ग्रामस्थां नाराजी होती. ग्रामस्थांचा पादुका बाहेर नेण्यास विरोध वाढत गेला आणि 6 नोहेंबर रोजी साईच्या पादुकांचा नियोजित चेन्नई दौरा रद्द करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती.

मात्र यावर साई संस्थानने कोणताही निर्णय न घेतल्याने, शिर्डीतील छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यानी रविवारी शिर्डीत एक निषेध फेरी काढत मारुती मंदीराजवळील जागेत बसत उपोषणास सुरवात केली आहे.