गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणात जाणा-या हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केलाय.

Updated: Aug 2, 2017, 05:38 PM IST
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर  title=

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणात जाणा-या हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केलाय. २२, २३ आणि २४ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी ही टोलमाफी देण्यात आलीय.

या टोल माफीसाठी आरटीओ आणि पोलीस स्टेशनमधून स्टिकर घ्यावे लागणार आहेत. गेल्यावर्षी देखील ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर टोलमाफी करण्यात आली होती. पण यंदा 20 दिवस आधीच ही घोषणा करण्यात आल्यानं टोलमाफी कूपन घेणा-या चाकरमान्यांची संख्या वाढणार आहे.