लोणावळ्याजवळ इनोव्हा गाडीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे-एक्सप्रेस हायवेवर लोणावळ्याजवळील पाटणमध्ये चालकाचा ताबा सुटून एका इनोव्हा गाडीचा अपघात झाला.

Updated: Aug 2, 2017, 04:15 PM IST
लोणावळ्याजवळ इनोव्हा गाडीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू title=

लोणावळा : मुंबई-पुणे-एक्सप्रेस हायवेवर लोणावळ्याजवळील पाटणमध्ये चालकाचा ताबा सुटून एका इनोव्हा गाडीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.

मुंबईकडून पुण्याकडे जाणा-या लेनदरम्यान हा अपघात झाला. इनोव्हा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं तीन झाडांना धडकून कार नाल्यामध्ये कोसळली. या अपघातात सांदीपान शिंदेंचा मृत्यू झाला, तर सुभाष साहेबराव जगताप, किसन जठार आणि मुक्ताराम तावरे असे तिघेजण जखमी झालेत. सर्व जखमींना तात्काळ निगडीमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.