पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री

पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री, पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

Updated: Aug 29, 2017, 08:11 PM IST
 पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री title=

मुंबई : पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री करण्यात आली आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. दुपारनंतरही मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे लोकल सेवादेखील पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच विमानसेवाही ठप्प आहे. शहरातील वाहतूक सेवा ठप्प असल्याने अधिक वाहतुकीचा भार नको म्हणून मुंबईत बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे.  

 मुंबई पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे पुणे आणि नाशिकमधून येणा-या वाहनांना मुंबईत नो एन्ट्री करण्यात आली आहे. मुंबईत आठ तास उलटल्यानंतरही वाहनांच्या लाबंच लांब रांगा आहेत. त्यामुळे मुंबई बाहेरून येणा-या वाहनांमुळं आणखीनंच वाहतूक कोंडीचं संकट वाढेल. ते टाळण्यासाठी मुंबईत बाहेरून येणा-या वाहनांना बाहेरच्या बाहेर माघारी वळवण्यात येत आहे. २६ जुलै २००६ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. तर मुंबईतून बाहेर जाणा-या वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश दिले आहेत. 

उर्से टोलनाक्यावरुन वाहने माघारी पाठविण्यात आली आहेत. पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद असून मध्य रेल्वेही ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. यामुळे वेगवान मुंबईचा वेग अतिशय मंदावला आहे.