आताची मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरण, 'या' पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एन डी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. दरम्यान नितीन देसाई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रफुल्ल पवार | Updated: Aug 4, 2023, 05:45 PM IST
आताची मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरण, 'या' पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल  title=

Nitin Desai Death : कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या (Nitin Desai Suicide) प्रकरणात आताची मोठी घडामोड घडली आहे. नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered against Five Persons) करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी खालापूर पोलीस स्थानकात (Khalapur Police) लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नितीन देसाईंच्या पत्नीची तक्रार
2 ऑगस्टला कलादिग्दर्शक आणि कर्जतमधल्या एनडी फिल्म स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी चार ऑगस्टला नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी लेखी तक्रार दाखल केली. ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून माननसिक त्रा दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असं या तक्रारीत म्हटलं होतं. 

या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस स्थानकात ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईच्या पार्थिावावर एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले. जोधा अकबरच्या सेट जवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. नितिन देसाईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला होता. याठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नातेवाईक आणि चाहत्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. अभिनेता अमिर खानसह दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. 

11 ऑडिओ क्लिप
नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्या पोलिसांच्या हाती लागल्या असून त्या ऑडिओ क्लिपमधून आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.  एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडं जाऊ नये. त्याऐवजी राज्य सरकारनं एनडी स्टुडिओ ताब्यात घ्यावा आणि नव्या कलावंतांना भव्य कलामंच उपलब्ध करून द्यावा, असा उल्लेखही त्या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं समजतंय. देसाईंच्या डोक्यावर तब्बल 250 कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार होती, अशी माहिती समोर आलीय.