चिपळुणात तब्बल ९ मगरींना पकडले

 घराच्या आवारात शिरलेल्या मगरीला पकडण्यात आले आहे. 

Updated: Aug 22, 2019, 06:37 PM IST
चिपळुणात तब्बल ९ मगरींना पकडले title=

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील माटेवाडीतल्या एका घराच्या आवारात शिरलेल्या मगरीला पकडण्यात आले आहे. गावातील अजय तटकरे यांच्या घराच्या आवारात ही मगर घुसली होती. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. 

वनविभागाच्या पथकाने या मगरीला पिंजऱ्यात जेरबंद केले. गेल्या महिन्याभरापासून चिपळूण शहरात मगरीचे मोठ्या प्रमाणात वावार सुरु आहे. त्यातच या मगरी आता मानवीवस्तीत शिरत आहेत. गेल्या महिन्याभरात चिपळूणमध्ये वन विभागाने ९ मगरींना पकडून सुरक्षितस्थळी सोडले आहे.