औरंगाबाद : तूर खऱेदीचा गोंधळ संपता संपत नाहीये. आधी तूर खरेदी केंद्र सुरु कधी होणार हा गोंधळ तर आता शेतक-यांकडून प्रति एकर फक्त २ क्विंटल तूर खरेदी करणारा नवा फतवा आलाय.
शासन नियमानुसार औरंगाबादेत एकरी २ क्विंटल तूरच शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर हमी भावात विकत घेतल्या जाणार आहे. एका एकरमध्ये जवळपास ८ ते १० क्विंटल तूर उत्पादन होतं. मात्र शासन २ क्विंटलच खरेदी करणार असल्यानं शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. उरलेल्या तूरीचं काय करावं असा प्रश्न शेतक-यांना पडलाय.
शासनाच्या या नियमानं राहिलेली तूर पुन्हा खुल्या बाजारात मातीमोल भावात शेत-यांना विकावी लागणार आहे. सरकारचा नियम असल्यानं आम्ही काही करू शकत नाही असं अधिकारी सांगत आहेत.