पुणे : भीक मागण्याच्या बाहण्याने आलेल्या चार महीलांनी पंधरा लाख रुपयांची चोरी केलीय. पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी स्टेशन चौकामधील महाराजा ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे.
काल दुपारी १२च्या सुमारास चार महिला भीक मागण्याच्या बहाण्याने दुकानात शिरल्या. दुकानात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर ज्वेलर्सच्या काउंटर वरील कामगार बाहेर आल्यावर वरील महिलांपैकी एका महिलेने ज्वेलर्सच्या काउंटर खालील पिशवीतून सोने ठेवलेला डबा पळवून नेला.
दुपारी ३ वाजता दुकान मालकाच्या हे लक्षात आले. दुकानात आल्यानंतर ज्वेलर्स मधील माल लावण्याकरिता बॅग बघितल्यानंतर सोने ठेवलेला डबा दिसला नाही. त्यानंतर त्यांनी दुकानातील सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर वरील महिलांनी सोन्याचा डबा चोरी केल्याचे दिसले. यामध्ये ५० तोळे सोने असल्याचे फिर्यादी सांगत असून त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला दिली आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करीत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.