Bhagat Singh Koshiyari: जाता जाता राष्ट्रावादीनं दाखवली कोश्यारींची Marksheet; इतिहासातील मार्क्स चर्चांचा विषय

Bhagat Singh Koshiyari Trolled By NCP: सध्या कोश्यारींचे एक निकालपत्र व्हायरल होताना ट्विटरवर दिसत असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॉट्सअप महाविद्यालय उभारण्यात आले आहे आणि त्यात भगतसिंह कोश्यारी हे विद्यार्थी आहेत. 

Updated: Feb 18, 2023, 04:39 PM IST
Bhagat Singh Koshiyari: जाता जाता राष्ट्रावादीनं दाखवली कोश्यारींची Marksheet; इतिहासातील मार्क्स चर्चांचा विषय  title=

Bhagat Singh Koshiyari Trolled By NCP: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद सुरू झाला आहे. त्यातून कालच्या निर्णयानंतर तर राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये सत्तासंघर्ष (Thackeray vs Shinde) नवी कलाटणी घेणार का याकडे आता सगळ्यांचेच लक्ष आहे. काही दिवसांपुर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांनी राजीनामा दिला आणि रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रूजू झाले. राज्यपालांच्या वक्तव्यांमुळे त्यांना मागच्या अनेक दिवसांपासून टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी हे नाव बरेच चर्चेत आले होते. मध्यंतरी एका भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे (Bhagat Singh Koshiyari Controversies) त्यांना मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. (ncp trolls bhagat singh koshiyari with posting his fake marksheet on twitter viral news marathi)

तेव्हा सत्ताधारी पक्षानं भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे सांगितले तर विरोधी पक्षानं कोश्यारी हटाव... अशी घोषणा सुरू केली होती. त्यामुळे भगतसिंह कोश्यारींच्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत सापडले होते. परंतु जाता जाता त्यांना टीकाही काही चुकली नाही. आता पुन्हा एकदा माजी राज्यपालांचे नावं हे चर्चेत आले आहे. यावेळी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसनं (NCP Trolles Bhagat Singh Koshiyari) ट्रोल केलं आहे. 

सध्या कोश्यारींचे एक निकालपत्र व्हायरल होताना ट्विटरवर दिसत असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॉट्सअप महाविद्यालय उभारण्यात आले आहे आणि त्यात भगतसिंह कोश्यारी हे विद्यार्थी आहेत. त्यात त्यांची गुणपत्रिका जाहीर करण्यात आली असल्याचे दाखवले आहे. परंतु ही प्रगती दाखविणारी गुणपत्रिका (Bhagat Singh Koshiyari Viral Marksheet) नसून तर ती अधोगती दर्शविणारी गुणपत्रिका आहे. 

इतिसाहात शून्य गुण, भुगोलात 35 गुण, नागरिक शास्त्रात 17 गुण, सामान्य ज्ञानमध्ये 34 गुण तर कला मध्ये 100 गुण अशी गुणपत्रिका तयार केली आहे. ज्यात शेरा असा लिहिण्यात आलाय की, सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या विद्यार्थ्याची वर्तवणुक पाहता याची सुरूवात बालवाडीपासून सुरू करणे योग्य राहील. त्यात त्याचे नाव भगतसिंह श्यारी असे लिहिले असून त्याची तुकडी ढ शी लिहिली आहे. या गुणपत्रिकेसोबतच एक पत्रही व्हायरल होत आहे. 

पत्रात काय?

प्रति,

मुख्याध्यापक,

पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे.

सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे.

तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी ही विनंती.

आपला नम्र मुख्याध्यापक

व्हॉटस्अप विद्यालय