Maharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा

Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे. 

Updated: Dec 7, 2022, 11:52 AM IST
Maharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा title=
ncp rohit pawar on Maharashtra-Karnataka border dispute

Maharashtra-Karnataka border dispute: कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (6 डिसेंबर) बेळगावमधील हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आणि  महाराष्ट्रातून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी (sharad pawar) 48 तासांचा अल्टीमेटच दिला आहे. त्यानंतर, आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील शिंदे सरकारला (Shinde Govt) कर्नाटक सीमावाद प्रकरणावरून सुनावले आहे. तसेच रोहित पवार यांनी शरद पवार जे बोलतात ते करुन दाखवतात, असे म्हटले आहे. 

 शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातून सर्वत्र महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याचदरम्यान आमदार रोहित पवार यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सुनावले आहे. "केंद्रात तुमची सत्ता आहे, कर्नाटकात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात तुमचीच सत्ता आहे. अशावेळी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जर यापद्धतीचं राजकारण होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही." असा इशारा देखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सत्ताधारी सरकारला दिला आहे. त्याचबरोबर जेव्हा शरद पवार बोललेत, तेव्हा महाराष्ट्राचे नागरिक म्हणून ते बोललेत. यापूर्वी त्यांनी ते करुन देखील दाखवलेलं आहे. पवारसाहेब बोलतात तेव्हा ते बोलण्यासाठी नाही तर करण्यासाठी असतं. महाराष्ट्राच्या सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, तर पवारसाहेब जे बोललेत ते करतील. शरद पवार जेव्हा ते करतील तेव्हा अख्खा महाराष्ट्रात कर्नाटकात (Karnataka in Maharashtra) दिसेल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  

वाचा: मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार का?     

 काय म्हणाले शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांच्या वक्तव्यामुळे सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लवकरच यावर तोडगा काढावा लागेल, असे ते म्हणाले. सीमावर्ती जिल्ह्यांतून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर दगडफेक होत असल्याचे त्यांनी सांगितले. 48 तासांत परिस्थिती सुधारली नाही, तर ते बाधित भागाला भेट देणार आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील लोकांनी आणि राज ठाकरेंच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील अनेक बसेसवर 'जय महाराष्ट्र' (Jai Maharashtra) रंगवले आणि निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली. कर्नाटकातही त्यांनी अनेक बसेसची तोडफोड केली.