राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंना ताब्यात घेतलं

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना नागपूर विमानतळाजवळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 11, 2017, 02:07 PM IST
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंना ताब्यात घेतलं title=

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना नागपूर विमानतळाजवळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादीने सरकारच्या विरोधात विविध मागण्यांसाठी हल्लाबोल मोर्चा काढला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा मोर्चा पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडवला आहे.

संपूर्ण कर्जमाफीसाठी हल्लाबोल

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तसेच शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा हल्लाबोल मोर्चा काढला आहे. दरम्यान, आज सकाळी विधिमंडळ सभागृहात राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात खडाजंगी झाली, यात सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विखे-पाटलांनी केला.

आघाडी सरकारकडून संपूर्ण कर्जमाफी नाही-सीएम

यावर मुख्यमंत्र्यांनी आपण १०० काय हजार रूपयांच्या स्टॅम्पवर लिहून देण्यास तयार असल्याचं सांगितलं, तर २००८-२००९ मध्ये, आघाडी सरकारच्या काळात देखील, कर्जमाफी सरसकट झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.