'सत्तेत बसलेले रिपोर्ट मॅनेज करतील' जितेंद्र आव्हाड यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

ठाणे पालिका सहआयुक्त महेश आहिर मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे, यानतंर जितेंद्र आव्हाड आणि त्यांची कन्या नताशा यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत

Updated: Feb 17, 2023, 05:46 PM IST
'सत्तेत बसलेले रिपोर्ट मॅनेज करतील' जितेंद्र आव्हाड यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप title=

Jitendra Awhad : ठाणे महानगर पालिकेतील (TMC) सहाय्यक आयुक्त महेश आहिर (Mahesh Aahir) मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटकपूर्ण जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Session Court) त्यांना जामीन मंजूर केला. यानंतर दुपारी जितेंद्र आव्हाड आणि त्यांची मुलगी नताशा यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि ठाणे पोलिसांवर घणाघात केला. 

महेश आहिर याच्या कार्यालयात पैशांची बंडल असल्याचा ऑडियो व्हायरल (Threaten Audio Viral) झाला आहे. त्यांचं शिक्षणात फेरफार करण्यात आला असून त्याला प्रमोशन कसं मिळालं असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. आव्हाड कुटुंबियाना धमकी देणाऱ्या ऑडिओ प्रकरणीही त्याला क्लीन चीट मिळेल, व्हायरल होणाऱ्या क्लिपमधला आवाज त्याचा नाही, हे सिद्ध केलं जाईल कारण सत्तेत कोण आहे, हे आम्हाला माहित आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. 

मी पाहिलेल्या गेल्या 35 वर्षांच्या राजकारणात असे घाणेरडे प्रकार कधीच पाहिले नव्हते, आता ठाण्यात काय सुरु आहे, एखादा अधिकारी इतका मुजोर कसा काय होऊ शकतो. अंडरवर्ल्डशी संबंध ठेवायचे आणि दिमाखात मिरवायचे असे प्रकार ठाण्यात सुरु आहेत, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.

नताशा आव्हाड यांची टीका
दोन दिवसांपूर्वी धमकीचा ऑडिओ व्हायरल झाल्यानतंर मी आणि आईने महेश आहिर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पण ठाणे पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही. आम्हाला कोणतीही सुरक्षा देण्यात आलेली नाही. आज महेश आहिरची ज्युपिटर हॉस्पीटलमधून डिस्चार्ज झाला. त्यामुळे आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी उपस्थित केला. पोलिस आम्हाला कोणतीही मदत करत नाहीएत, उपमुख्यमंत्र्यांनी सुरक्षा व्यवस्था देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. आमचं राजकारणाशी काहीही संबंध नाही, पण आम्हाला यात ओढलं जात आहे, असा आरोपही नताशा आव्हाड यांनी केल आहे. माझ्या पतीला घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांचं कुटुंब घाबरलेलं आहे असंही नताशा यांनी सांगितलं. 

काय आहे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते जितेंद्र आव्हाड, त्यांची कन्या नताशा आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ऑडिओ क्लिपमधला आवाज ठाणे महानगर पालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहिर यांचा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आहिर यांना मारहाण केली. याविरोधात आहिर यांनी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये?
व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये जीतेंद्र आव्हाड यांच्या जावयाला जीवे मारण्याबाबतचं संभाषण आहे. आव्हाड माझ्याविरोधात काहीही करु शकतो. त्यामुळे स्पेनमध्ये नताशााच पत्ता शोधायला बाबाजीला सांगून स्पेनला शूटर लावले आहेत. आव्हाडचा जावई ठाण्यात आला नाही तर त्याचा बापावर एक अटॅक केला तर एका दिवसात इथं येईल. एअरपोर्टवर फिल्डिंग लावली आहे. 

विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे. त्याच्या आीवडिलांबरोबर एक कांड केलं तो तर लगेच येईल. आपण एअरपोर्टपासून फिल्डिंग लावून ठेवलेली आहे. त्याचा गेम करणारच. त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळेल मुलीचं दु:ख काय असतं, अशा आशयाची ही ऑडिओ क्लिप आहे.