एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

 राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण 

Updated: Nov 19, 2020, 05:42 PM IST
एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण  title=

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी एकनाथ खडसे मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. माझ्या सानिध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे खडसे यावेळी म्हणाले. मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असे आवाहन देखील खडसेंनी यावेळी केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर पहील्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. पण खडसेंच्या कुटुंबात कोरोनाची लागण झाल्याने पवारांना हा दौरा रद्द करावा लागला होता.