Ajit Pawar Video : कुंकवाची अ‍ॅलर्जी पण चिमुरडीच्या हट्टापुढे अजित पवारांचं काही चाललं नाही

NCP Leader Ajit Pawar Viral Video : पुण्यामध्ये एका चिमुकलीने हट्टाने अजित पवार यांना कुंकू लावून औक्षण केलं. हा फोटो व्हायरल होण्यामागे कारणही तसच काहीसं आहे. आपल्या तडफदार आणि वेळेचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या अजित पवारांना कुंकूवाची एलर्जी असल्याने ते कोणाकडून कुंकू लावून घेत नाहीत.

Updated: Jan 22, 2023, 11:11 PM IST
Ajit Pawar Video : कुंकवाची अ‍ॅलर्जी पण चिमुरडीच्या हट्टापुढे अजित पवारांचं काही चाललं नाही title=

सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Social Media Viral Video) होत असलेला पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये एका चिमुकलीने हट्टाने अजित पवार यांना कुंकू लावून औक्षण केलं. हा फोटो व्हायरल होण्यामागे कारणही तसच काहीसं आहे. आपल्या तडफदार आणि वेळेचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या अजित पवारांना कुंकूवाची अ‍ॅलर्जी असल्याने ते कोणाकडून कुंकू लावून घेत नाहीत. मात्र चिमुकलीच्या हट्टापुढे ते नमल्याचं दिसून आलं. (NCP leader Ajit Pawar Viral Video krutika wave Pune Latest Marathi News) 

नेमकं काय घडलं?
अजित पवार हे शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या कार्यक्रमाला आले असताना कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी एस. के. डी. ग्रुप च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुभाष गव्हाणे यांची तीन वर्षाची मुलगी कृतिकाने त्यांना औक्षण केलं. औक्षण करताना असं काही झालं की अजित पवारांना कुंकवाची अ‍ॅलर्जी होती, मात्र चिमुकलीपुढे त्यांचं काही चाललं नाही.

औक्षण करताना कृतिकाने कुंकू लावायला हात पुढे केला तेव्हा दादांनी मला अ‍ॅलर्जी असल्याचं सांगितलं. पण त्यावेळी निरागस मुलीकडे पाहून दादा म्हटले लावून टाक. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून पवार यांचा दुसरा रूप देखील आता पाहायला मिळत आहे.

पुण्यात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद, गोहत्या, छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली.