अमित शाह-शरद पवार यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि पुढे काय घडेल?

 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Ncp Chief Sharad Pawar) दिल्लीत (Delhi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Home Minister Amit Shah) भेट घेतली होती.   

Updated: Aug 5, 2021, 08:50 PM IST
अमित शाह-शरद पवार यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि पुढे काय घडेल? title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Ncp Chief Sharad Pawar) दिल्लीत (Delhi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Home Minister Amit Shah) भेट घेतली. या भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. काय होतं या भेटीचं गोड कारण? पवार आणि शाह या दोन्ही चाणक्यांनी नेमकी काय साखरपेरणी केली, नक्की काय घडलं, हे जाणून घेऊयात. (ncp chief sharad Pawar requested home minister Amit  Shah to visit Vasantdada Sugar Institute in september during to Pune tour)  

राजधानी दिल्लीत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केली असताना दुसरीकडं शरद पवार यांनी मात्र अमित शाहांची भेट घेतली. त्यामुळं साहजिकच सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या. पवार-शाह भेटीत नेमकं काय घडलं, यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जातायेत. या भेटीत राजकारणाची नव्हे, तर साखरेच्या अर्थकारणाची चर्चा झाल्याची बाब आता समोर आली आहे.

नव्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शाहांकडे सोपवण्यात आलीय.साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित मागण्यांसाठी पवारांनी त्यांची भेट घेतली. FRPची 16 ते 17 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळं साखरेची किंमत वाढवावी, अशी मागणी पवारांनी केली. अमित शाह येत्या सप्टेंबरमध्ये पुणे दौऱ्यावर (Amit Shah Pune Tour In September) येणार आहेत. त्यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला (Vasantdada Sugar Institute) भेट देण्याची विनंती पवारांनी शाहांना केली.

अमित शाह हे भाजप सरकारचे तर शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे चाणक्य. सहकाराच्या निमित्तानं या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये साखरपेरणी तर झाली आहे. त्यातून आता पुढं काय काय गोड होणार, याकडे उभ्या भारतीय राजकारणाचं लक्ष लागून राहिलंय.