परभणी : राज्यात थंडीची लाट पसरली असून परभणीच तापमान तर या वर्षी ५.५ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे परभणीकरांना गुलाबी सह बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय.
परभणी जिल्ह्यात सपाट भूप्रदेश असल्या कारणाने थंडी चा जोर कायम दिसत आहे.मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातल्या तुलनेत परभणीच किमान तापमानाने काही दिवसापासून नीचांक गाठला आहे.
हा पारा ५.५ वरुन ८.२ अंश सेल्सिअस पर्यंत वर जाऊन पोहोचेल असे मत व्यक्त केले जात आहे.