नवनीत राणा यांचा पार्थ पवार यांच्यासाठी प्रचार

मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या.

Updated: Apr 27, 2019, 07:41 PM IST
नवनीत राणा यांचा पार्थ पवार यांच्यासाठी प्रचार title=

लोणावळा : मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. लोणावळ्यात आयोजित पदयात्रेत नवनीत राणा यांनी पार्थ पवार यांच्यासाठी प्रचार केला. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये दम आहे. त्यामुळं कितीही ट्रोल केलं तरी बिघडत नाही, असं नवनीत राणा यांनी यावेळी म्हटलं.

मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या विरोधात युतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रिंगणात आहेत. मावळमधील निवडणूक पवार कुटुंबांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते मावळमध्ये ठाण मांडून आहेत.