VIRAL VIDEO : पाण्याखालून चालणारा ट्रॅक्टर पाहिलात का?

नाशिक जिल्ह्यात सध्या हा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय

Updated: Jul 10, 2019, 11:02 PM IST
VIRAL VIDEO : पाण्याखालून चालणारा ट्रॅक्टर पाहिलात का? title=

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : नाशिक जिल्ह्यात एक व्हीडिओ सध्या धुमाकूळ घालतोय. नदीच्या एका किनाऱ्यावरून एक ट्रॅक्टर वेगात दुथडी वाहणाऱ्या नदीपात्रात शिरतो. काही क्षणात हा ट्रॅक्टर त्यावरच्या दोन स्वारांसह पुण्याखाली बुडतो. लोकांना वाटतं ट्रॅक्टर बुडाला... पण पाहता पाहता हा ट्रॅक्टर स्वारांसह नदीच्या दुसऱ्या तीरावर सुखरूप बाहेर पडतो. नाशिक जिल्ह्यात सध्या हा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. 

ट्रॅक्टरमध्ये असलेला टॉर्क आणि बीएचपी यामुळे ट्रॅक्टर सरळ गेला. पाण्याच्या प्रवाहाला वेग नसल्याने फारसा अडथळा आला नसावा. तसंच ट्रॅक्टरचा सायलेन्सर वरच्या दिशेला असतो त्यामुळे त्यात पाणी गेलं नसण्याची शक्यता आहे, असं ऑटोमोबाईल तज्ज्ञ संतोष खुळे यांचं म्हणणं आहे. 

पाण्यात अडकलेल्या दुचाकी, चार चाकीही जोवर इंजिन वेगात फिरतंय तोवर पाण्यात तग धरतात, हे आपण अनेकदा पाहिलं असेल. हेच तत्व लागू झाल्याने ट्रॅक्टर पाण्याखालून पलीकडे पोहोचला असण्याची शक्यता आहे.