आधारकार्ड नसेल तर मोक्ष नाही !

जन्मापासून मृत्यूपर्यंत आधारकार्ड गरजेचं असल्याचं राज्य सरकारच्या एका फतव्यानिशी शब्दशः सिद्ध झालंय. आता अंत्यसंस्कारांआधी इतर कागदपत्र्यांसह आधारकार्डही सादर करावे लागणार आहे. मृताचे आधारकार्ड नसेल तर त्याऐवजी प्रमाणपत्र सादर करण्याचं सुचीत करण्यात आलंय. त्यात चुकीची माहिती आढळली तर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 09:54 PM IST
आधारकार्ड नसेल तर मोक्ष नाही ! title=

नाशिक : जन्मापासून मृत्यूपर्यंत आधारकार्ड गरजेचं असल्याचं राज्य सरकारच्या एका फतव्यानिशी शब्दशः सिद्ध झालंय. आता अंत्यसंस्कारांआधी इतर कागदपत्र्यांसह आधारकार्डही सादर करावे लागणार आहे. मृताचे आधारकार्ड नसेल तर त्याऐवजी प्रमाणपत्र सादर करण्याचं सुचीत करण्यात आलंय. त्यात चुकीची माहिती आढळली तर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

नाशिक मनपा एवढ्यावर थांबली नाही. मृताला कोणतं व्यसन होतं का याची माहितीही भरून घेतली जातेय. कोणाला प्रबंध लिहीण्यासाठी अशी माहिती उपयोगी ठरते असं अजब स्पष्टीकरण महापालिका आरोग्य विभाग देत आहे. यावर तुफान टीका केली जात आहे. 

आज जे लोक हयात आहेत त्यांच्या आधारकार्ड संदर्भात अनेक तक्रारी आहेत .कोणाचे बोटांचे ठसे जुळत नाहीत तर कुणाच्या नावात चुका करून ठेवल्यात. त्यामुळे जिवंतपणी ज्या आधारकार्डमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तो मृत्यनंतरही सुईच राहणार आहे. त्यामुळे यात सुसूत्रणा गरजेची आहे.