धुळ्याचे शहीद जवान मिलिंद खैरनार यांची अजून एक शौर्यगाथा...

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मिलिंद खैरनारांनी  मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही मोठं शौर्य गाजवल्याचं समोर आलंय. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 07:38 PM IST
धुळ्याचे शहीद जवान मिलिंद खैरनार यांची अजून एक शौर्यगाथा...  title=

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मिलिंद खैरनारांनी  मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही मोठं शौर्य गाजवल्याचं समोर आलंय. 

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संरक्षण खात्यानं एक स्पेशल फोर्स मुंबईत रवाना केली होती. यात मिलिंद खैरनार यांचाही प्रामुख्यानं समावेश होता. एवढंच नव्हे तर नरीमन हाऊसमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली होती. आणि त्यांच्या या शौर्याचा त्यांच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे. मिलिंद यांचे आई-वडील मोठ्या अभिमानानं त्यांची ही शौर्यगाथा ऐकवतात. मिलिंद खैरनार हे 15 वर्षांपासून सैन्य दलात सेवा बजावत होते. मिलिंद यांची चंदीगडमध्ये पोस्टिंग होती.

सहा महिन्यांसाठी त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यातल्या अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता. मात्र आज दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं.