सागर गायकवाड, झी 24 तास नाशिक : तुम्ही जर पाणी घरात भरून ठेवलं नसेल तर आताच ठेवा कारण ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दोन दिवस पाण्याचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणं गरजेचं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पंचवटी विभागातील काही प्रभागांमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पाणीकपात केल्यानं नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून आधीच पाण्याची तरतूद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नाशिकच्या पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील 30 लक्ष लिटर्स क्षमतेच्या जलकुंभाचे उर्ध्ववाहिनीवर जोडणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटी परिसरात आज पाणी येणार नाहीये तर उद्या कमी दाबाने पाणी येणार असल्याचं नाशिक महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे. प्रभाग 4, 5,आणि 6 या प्रभागात उद्या पाणी येणार नाही.