धक्कादायक! विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला

आदेश चोपडे आणि चिनमय अट्र अट्रावलकर या दोन विदयार्थ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Updated: May 7, 2018, 10:55 AM IST

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाची वेबसाईट हॅक करून चक्क पेपर फोडल्याची घटना नाशिकमध्ये घडली. एस वाय बीएस सीसी या वर्गाचा लिनीयर अलझेब्रा या विषयाचा पेपर आय टी इंजिनियरिंगच्या मुलांनी हॅक करत पेपर व्हायरल केला आहे. आदेश चोपडे आणि चिनमय अट्र अट्रावलकर या दोन विदयार्थ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.