कॉलेजला बंक मारल, रस्त्यात कपडे बदलले आणि लग्नाला निघाले; वाटेतच असं काही घडलं की पाच जणांचा जीव गेला

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Nashik Students) गाडीला अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.  

Updated: Dec 10, 2022, 07:05 PM IST
 कॉलेजला बंक मारल, रस्त्यात कपडे बदलले आणि लग्नाला निघाले; वाटेतच असं काही घडलं की पाच जणांचा जीव गेला title=

तरूणपणात अनेक मुलांना टवाळखोरी करायला आवडते. ही टवाळखोरी कधी कधी त्यांच्या अंगलट देखील येते. अशीच एक धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. या घटनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Nashik Students) गाडीला अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.  

कॉलेज बुडवून लग्नाचा प्लान

नाशिकच्या (Nashik News) सिन्नर येथील महाविद्यालयात शिकत असलेले 8 विद्यार्थी कॉलेजला दांडी मारून लग्नाला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लग्नासाठी हे तरूण-तरूणी खुपच उत्साही असल्याचे दिसत होते. कारण या मुलांनी गाडीतच कपडे बदलले होते. शिवाय रस्त्यातच त्यांनी पार्टी केल्याचे समोर आले आहे. 

स्विफ्ट कारला अपघात 

एका विद्यार्थ्याने मामाची स्विफ्ट कार (Swift Car) आणली होती.या कारमधून हे विद्यार्थी प्रवास करत होते. यावेळी सिन्नर जवळील मोहदरी घाटात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेरहून नाशिककडे (Nashik) जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडर वरून दुसऱ्या मार्गावर गेली. यावेळी नाशिकहून सिन्नरकडे जाणाऱ्या इनोव्हा आणि स्विफ्ट कारवर जाऊन पलटी झाली, या भीषण अपघातात इनोव्हा आणि स्विफ्ट चालक जखमी झाले आहेत तर धडक देणाऱ्या स्विफ्टमधील पाच विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्ष बोडके (वय 17), सायली पाटील (वय 17), मयुरी पाटील (वय 16), प्रतीक्षा घुले (वय 17),  शुभम तायडे (वय 17) असे या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

कारमध्ये सापडल्या धक्कादायक गोष्टी 

महाविद्यालयीन विद्यार्थी (Nashik Student) प्रवास करत असलेल्या गाडीत धक्कादायक गोष्टी आढळल्या आहेत.  अपघात झालेल्या स्विफ्ट कारमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि इतर खाद्यपदार्थ आणि महाविद्यालयाचे ड्रेसही आढळून आले आहेत. तसेच या गाडीमध्ये विद्यार्थ्यांनी कपडे बदलल्याची माहिती आहे. कारण गाडीत शाळेचे कपडे आढळले होते. 

दरम्यान या घटनेने विद्यार्थ्यांच्या (Nashik Student) कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कुटूंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे.