अंत्यविधी करून घरी परतणाऱ्यांनाच रस्त्यात मृत्यूनं गाठलं, 5 जणांनी गमवला जीव

लासलगावहून विंचूरच्या दिशेने निघालेली ॲपे रिक्षाचा भीषण अपघात

Updated: Sep 25, 2021, 10:07 PM IST
अंत्यविधी करून घरी परतणाऱ्यांनाच रस्त्यात मृत्यूनं गाठलं, 5 जणांनी गमवला जीव title=

चेतन कोळस झी मीडिया नाशिक: REET परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळानं घाला घातल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंत्यविधी करून घरी परतणाऱ्यांना मृत्यूनं गाठल्याची घटना घडली आहे. लासलगाव इथल्या विंचूर रोड वरील मंजुळा पॅलेस समोर ॲपे रिक्षा आणि हायवा यांच्यात जोरदार धडक झाली. 

या भीषण अपघातात रिक्षातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात संध्याकाळी 6.30 च्या सुमारास झाला. मृतांमध्ये पाचही पुरुषांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. लासलगावहून विंचूरच्या दिशेने निघालेली ॲपे रिक्षाचा भीषण अपघात झाला. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.

रिक्षा चालकासह 5 जण प्रवास करत असताना विंचूरहून लासलगावच्या दिशेने निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने जागेवरती पाच जणांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये सुहास मनोहर निकाळे वय 40 विंचूर रिक्षा चालक, विठ्ठल बाजीराव भापकर वय 65 लोनी प्रवरा, भाऊसाहेब बाळासाहेब नागरे वय 60 लोणी प्रवरा, किसनदास बैरागी वय 60 धारणगाव खडक,रतन पवार वय 40 इंदीरा नगर विंचूर यांचा समावेश आहे.

यातील दोन प्रवाशी लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे भाऊसाहेब पठारे यांच्याकडे अंत्यविधीसाठी सकाळी गेले होते. अंत्यविधी कार्यक्रम पूर्ण करून घरी परत जात असताना मृत्यूनं गाठलं. आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.