Maharashtra-Karnataka border dispute: कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (6 डिसेंबर) बेळगावमधील हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला. त्यानंतर आता कर्नाटक सीमा वादाचे पडसात नाशिकमध्ये पडू लागले आहे. नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेच्या (Nashik Protest Karnataka) वतिने कर्नाटक बँकेच्या बाहेरील फलकांवर काळे फासण्यात आले आहे. स्वराज्य संघटनेने बँकेच्या बाहेर भगव्या रंगात जय महाराष्ट्र (Jai Maharashtra) असे देखील लिहिण्यात आले आहे. स्वराज्य संघटनेचे (swaraj sanghatana ) प्रवक्ते करण गायकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून नाशिकमध्ये स्वराज संघटना आक्रमक (Swaraj organization aggressive) झाली होती.
महाराष्ट्रातील अनेक नागरिक आणि भक्त हे कर्नाटकमध्ये जात असतात. त्यांना त्रास देऊन नका अन्यथा तुमचीही लोकं महाराष्ट्रात राहतात तुमच्याही गाड्यांना काचा आहेत, हे ध्यानात ठेवा असा इशाराच कर्नाटक सरकारला स्वराज्य संघटनेने दिला आहे. कर्नाटकमध्ये मंगळवारी दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक वाहनांची तोडफोड करत महाराष्ट्रातील वाहनांना अडविण्यात आले होते. त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि विविध संघटना आक्रमक होतांना दिसून येत आहे. तसेच स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत अन्यथा मला कर्नाटकमध्ये यावे लागेल असा इशारा दिल्याने स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
वाचा : “…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
तीव्र आंदोलन करणार...
तसेच आज (7 डिसेंबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यानी कर्नाटक बँकेसमोर येत आंदोलन सुरु केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बँकेच्या बोर्डाला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलन कर्ते भगवे झेंडे घेऊन, काळे कपडे परिधान करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. जर कर्नाटक येथील संघटनाने आपली दडपशाही थांबवली नाही तर आंदोलन अधिकधिक तीव्र करण्याचा इशारा स्वराज्य संघटनाकडून देण्यात आला आहे.