नाशिकमधला धक्कादायक प्रकार! हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला

नाशिकमधल्या कालिदास कला मंदिरात एका कार्यक्रमात मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेक्षक आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यक्रमच बंद पाडला. कला मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

योगेश खरे | Updated: Sep 14, 2023, 08:10 PM IST
नाशिकमधला धक्कादायक प्रकार! हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधल्या कालिदास कला मंदिरात (Kalidas Kala mandir) कवि कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्या कार्यक्रमात चक्क मराठी भाषिकां (Marathi Audience) प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे एकच गोंधळ उडाला. कार्यक्रमाला प्रवेश नाकारल्याने मराठी भाषिक प्रेक्षक आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यक्रम बंद पाडला. हिंदी प्रसारणी सभेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि केवळ हिंदी भाषिकांना या कार्यक्रमाचे पासेस देण्यात आले होते. कार्यक्रमासाठी कोणतंही तिकट नव्हत, हा कार्यक्रम मोफत होता. 

कवी कुमार विश्वास यांच्या कविता ऐकण्यासाठी कला मंदिराबाहेर अनेक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण या कार्यक्रमाचे पासेस केवळ हिंदी भाषिकांना वाटण्यात आले होते. मराठी भाषिकांना पासेस देण्यात आले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना प्रवेश नाकारण्यात आला. यावर आक्रमक होत मराठी भाषिक प्रेक्षकांनी कलामंदिराच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घातला.

प्रेक्षकांचा वाढता गोंधळ लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आलं. जोपर्यंत प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरु करु देणार नाही असा पवित्रा प्रेक्षकांनी घेतला आहे. 

राष्ट्रीय हिंदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये हिंदी कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात केवळ हिंदी भाषिकांना पास देण्यात आले होते मात्र मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात हे कवी संमेलन ऐकण्यासाठी आले असता त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी मराठी भाषिकांनी कालिदास कला मंदिरासमोर गोंधळ घालत हिंदी भाषिकांच्या निषेच्या घोषणा दिल्या. महाराष्ट्रात कार्यक्रम होऊन मराठी भाषिकांना प्रवेश नसेल तर हा कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही असा पवित्रा मराठी भाषिकांनी घेतला आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले. अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.