नाशिक : एका महिलेची रिक्षात प्रसूती झाल्याची बातमी झी २४ तासने प्रसिद्ध केली आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
दिंडोरी रोडवरील पालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात कर्मचारी नसल्याने श्रेया साकेत या महिलेची रुग्णालयाबाहेर रिक्षातच प्रसूती झाली होती. रुग्णालयात नर्स, कर्मचारी, आया आणि डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यावेळी प्रसूती कळा सहन न झाल्याने श्रेया साकेत या महिलेची भररस्त्यात रिक्षातच प्रसूती झाली होती. याबाबतचं वृत्त झी 24 तासनं सोमवारी रात्री प्रसारीत केलं होतं.
या प्रकरणाची नाशिक पालिकेच्या आरोग्य विभागानं तात्काळ दखल घेत संबंधित दोशी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रकरणाची दखल घेऊन रात्री उशिरा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ५ परिचारिकाच निलंबिन या प्रकरणात करण्यात आलं आहे. मागापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालय मार्फत या घटनेची चौकशी करण्यात आली. त्यानुसार डॉ हिरामण कोकणी,यांच्यासह इंचार्ज सिस्टर सरला रुपवते, स्टाफ परिचारिका मनीषा शिंदे, एम एम ठाकूर, भारती कोठारी, श्रीमती देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर हंगामी सुरक्षा रक्षक भरत गायकवाड आणि लक्ष्मी निकम यांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.