नाशिककरांसाठी आनंदाची बातमी

Updated: May 14, 2018, 05:14 PM IST

नाशिक : मुंबई-नाशिक विमानसेवा ठप्प असतानाच आता नाशिककरांना दिलासा देणारी बातमी... नाशिक दिल्ली आणि दिल्ली नाशिक अशी विमानसेवा पुरवण्याची घोषणा जेट एअरवेजने केलीय.

आठवड्यातून तीन दिवस नाशिक दिल्ली विमान उड्डाण करेल. तसंच बोईंग ७३७-८०० हे बिझनेस क्लास असलेलं विमान या मार्गावर तैनात करण्यात येईल. उडान २ योजनेत मोठ्या एअरलाईनने सेवा देण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे.