नाशकात गॅसच्या टॅंकरला अपघातानंतर भीषण आग

पेट्रोल पंपापासून अवघ्या 100 फुटांवर हा अपघात झाला. 

Updated: Aug 6, 2018, 06:48 PM IST

नाशिक : नाशिकमध्ये ज्वालाग्राही LPG गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात होऊन सुरू झालेल्या गॅस गळतीमुळे आग लागलीये. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पांडुर्ली, घोटीहून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या घटना टँकरला अपघात झाला. पांडुर्ली शिवारात असणाऱ्या वाजे पेट्रोल पंपापासून अवघ्या 100 फुटांवर हा अपघात झाला. 

दोन तास वाहतूक कोंडी 

छोटा रस्ता असल्याने याठिकाणी लोकांची खूप गर्दी झाली आहे. तसेच या रस्त्यावर भंडारदाऱ्याला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची रिघही पाहायला मिळतेयं. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरीही गेली दोन मोठ्या प्रमाणात तास वाहतूक कोंडी पाहायला मिळतेयं.