प्रसिद्ध कुस्तीपटूची मुंबई-आग्रा हायवेवर हत्या, नाशिकमध्ये खळबळ

भर रस्त्यात कोयत्याने वार करत आणि त्यानंतर बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आला. ही सर्व घटना नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा या ठिकाणी घडली.

Updated: May 10, 2024, 06:53 PM IST
प्रसिद्ध कुस्तीपटूची मुंबई-आग्रा हायवेवर हत्या, नाशिकमध्ये खळबळ title=

Nashik Wrestler Death : मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळील निर्मल आश्रमासमोर कुस्तीपटूची हत्या करण्यात आली आहे. भर रस्त्यात कोयत्याने वार करत आणि त्यानंतर बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आला. ही सर्व घटना नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा या ठिकाणी घडली. ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाचा भर रस्त्यात खून करण्यात आला. नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा या ठिकाणी असलेल्या निर्मल आश्रमासमोर ही हत्या झाली. भूषण लहामगे असे या तरुणाचे नाव आहे. भूषण हा जिल्हास्तरीय कुस्तीपटू असल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु

भूषणवर आधी कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर बंदुकीतून गोळ्या झाडत त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी बंदुकीतून 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले. या हत्येनंतर मारेकरी हे फरार झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर ही हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या वाडीवहे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे. दरम्यान कुस्तीपटू असलेल्या भूषण लहामगेची हत्या कोणी केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.