नाशिक जिल्ह्यातील मोठी धरणे भरली

जुलै महिन्यातील सरासरी पावसाच्या नोंदीपैकी यावेळी दीडशे टक्के पाउस अधिक पडला आहे. 

Updated: Aug 6, 2017, 12:11 AM IST
नाशिक जिल्ह्यातील मोठी धरणे भरली title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यामधल्या विक्रमी पावसानं नाशिक जिल्ह्यातील १०  छोटी मोठी धरणे १०० टक्के भरली आहेत. 

जुलै महिन्यातील सरासरी पावसाच्या नोंदीपैकी यावेळी दीडशे टक्के पाउस अधिक पडला आहे. 

यात प्रमुख वैतरणा,  गौतमी गोदावरी दारणा, भोजापूर, हरणबारी, केळझर धरणे असून गंगापूर आणि  दारणा सुरक्षिततेसाठी विसर्ग केला जातोय हि दोन्ही धरणे 80 टक्के भरले आहेत. 

नवीन झालेले भावली आणि वाकी धरणहि यावेळी भरल्याने इगतपुरी तालुका हा मुंबई मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यासाठी तहान भागविणारा ठरला आहे.