नाशिक शहर स्फोटाने हादरले, ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये ब्लास्ट

Nashik Blast:  नाशिक शहर स्फोटाने हादरले आहे. ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट झाला आहे. 

योगेश खरे | Updated: Dec 9, 2023, 06:29 PM IST
नाशिक शहर स्फोटाने हादरले, ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये ब्लास्ट title=

Nashik Blast: नाशिक शहर स्फोटाने हादरले आहे. रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट झाला आहे. नाशिक शहरातील शांतिनिकल निकेतन महसूल सोसायटी परिसरात ही घटना समोर आली आहे. ऑक्सीजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या परिसरातील सात ते आठ मजल्यापर्यंतची इमारतीच्या काचा फुटलेली आहेत. इतकच नाही तर भोवतालची वाहना च्या काचा फुटून रस्त्यावर पसरले आहेत. या भयंकर कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटाने परिसरातील नागरिक हादरली आहेत.