साखळी चोरांचा भाजप नगरसेविकेला फटका

सोनसाखळी चोरांचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच बसतो असे नाही. सोनसाखळी चोर राजकीय व्यक्तिंच्या दागिण्यांवरही डल्ला मारू शकतात. नाशिकमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे पेंडंट चोरट्यांनी लंपास केले आहे.

Updated: Oct 24, 2017, 01:59 PM IST
साखळी चोरांचा भाजप नगरसेविकेला फटका title=

नाशिक : सोनसाखळी चोरांचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच बसतो असे नाही. सोनसाखळी चोर राजकीय व्यक्तिंच्या दागिण्यांवरही डल्ला मारू शकतात. नाशिकमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे पेंडंट चोरट्यांनी लंपास केले आहे.

लक्ष्मी पूजनासाठी झाडू आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी भालेराव घराबाहेर पडल्या होत्या. तेव्हा त्यांच्यावर पाळत ठेवत चोरट्याने भालेराव यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. भालेराव यांनी आरडाओरडा करत प्रतिकार केला असता चोरट्याने तिथून पळ काढला. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतलं आहे. मात्र, त्यांच्या दत्तक शहरात सत्ताधारी भाजपच्याच नगरसेविका सुरक्षित नाहीत तर, सर्वसामान्य महिला कशा सुरक्षित राहतील, असा सवाल उपस्थित होतोय. दिवाळीच्या चार पाच दिवसात नाशिक शहरात वाहन चोरी सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी आता पुढे येत आहे.

नाशिक शहरात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसही या चोरट्यांच्या मागावर आहेत. मात्र, निर्जण किंवा फारशी वर्दळ नसलेले ठिकाण पाहून हे चोरटे महिलांच्या दागिण्यांवर डल्ला मारत असल्यामुळे पोलीसही हैराण आहे. आतापर्यंत अनेक घटनांमध्ये चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. दरम्यान, दिवाळीचा सण असल्यामुळे या काळात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. चोरटेही ही गोष्ट हेरून हातसफाई करण्याच्या विचारात असतात. त्यामुळे दिवाळी आणि इतर सणावारांच्या काळात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते.