नरहरी झिरवाळांनी इंदुरीकर महाराजांसोबत धरला ठेका; Viral Video तुम्ही पाहिला का?

Narhari Zirwal Dance: तुम्ही सोशल मीडियावर अपडेट असाल तर तुमच्यापर्यंत नरहरी झिरवाळ यांचा एक डान्स व्हिडीओ पोहोचला असेल. यात ते इंदुरीकर महाराजांसोबत ठेका धरताना दिसत आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 9, 2024, 03:00 PM IST
नरहरी झिरवाळांनी इंदुरीकर महाराजांसोबत धरला ठेका; Viral Video तुम्ही पाहिला का? title=
नरहरी झिरवाळ आणि इंदुरीकर महाराज

Narhari Zirwal Dance: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ आपली साधी राहणी, बोली, संभाषण कौशल्य यामुळे नेहमी चर्चेत असतात. सत्ताधारी पक्षात सहभागी असणाऱ्या तत्कालिन आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर  उडी मारल्या होत्या. त्यावेळी ते माध्यमांच्या कॅमेरासमोर राहिले. आता पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे नरहरी झिरवाळ चर्चेत आले आहेत.  तुम्ही सोशल मीडियावर अपडेट असाल तर तुमच्यापर्यंत नरहरी झिरवाळ यांचा एक डान्स व्हिडीओ पोहोचला असेल. यात ते इंदुरीकर महाराजांसोबत ठेका धरताना दिसत आहेत. या व्हिडीओवर सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

पाहा व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

पोपटासारखे बोलण्यात पटाईत लोकांना आपल्या क्षेत्रात भुरळ पडणारे आणि आपल्या क्षेत्रात प्रवचन करून लोकांना मोहित करणारे दोन अवलिया यांनी नृत्य केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हरिनाम सप्ताह करत प्रवचन करणारे सुप्रसिद्ध निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या इंदुरी गावात सुरू असलेल्या कार्यक्रमात राजकारणातले ह भ प नरहरी शिरवळ जाऊन पोहोचले आणि याच कार्यक्रमात ताल धरत दोघांनी नृत्यही केले. इतकच नव्हे तर फुगडीही खेळत त्यांनी अहिल्यानगर मधील इंदोरी गावातील ग्रामस्थांचं मनोरंजन केलं. सध्या झिरवाळ आमि इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. 

मंत्र्यालयातील जाळ्यांवर का मारली होती उडी?

सरकारने धनगर सामाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी या मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर उडी मारली होती. याच मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारही आंदोलनात सहभागी झाले होते. ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. पेसी भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाहीत असं झिरवळ म्हणाले होते.