नवी दिल्ली : लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा केले तर नाहीच, पण १५ रुपयेही जमा केले नाहीत असा टोला ज्येष्ठ नगरसेवक अण्णा हजारे यांनी लगावला आहे. लोकपालच्या मुद्दयावरुन अण्णा आक्रमक झाले आहेत. सध्या राळेगणसिद्धीमध्ये सरकारविरोधी आंदोलनाची दिशा ठरवत आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात जनआंदोलन तीव्र करणार आहेत.
ज्या लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केलं होतं, ते अद्याप अस्तित्वात आलं नाही. मनमोहन सिंग सरकारनं दगा दिला, तसाच मोदी सरकारनंही विश्वासघात केल्याचे वक्तव्य अण्णा हजारे यांनी केले आहे.
अण्णा हजारे यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकारनं कोणतंही पाऊल उचलले नसून उलट लोकपाल कायदा आणखी कमकुवत केल्याचा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला आहे.